हे ब्लॉग्स म्हणजे चित्रपटांचे रसग्रहण नव्हे. समीक्षा तर नव्हेच नव्हे. तर एका सामान्य सिने रसिकाच्या किंवा आस्वादकाच्या भूमिकेतून मांडलेला त्या चित्रपटाचा लेखाजोखा. ब्लॉगच्या नावावरून लक्षात येईलच की इथे कोणत्याही भारतीय सिनेमापेक्षा इतर देशांच्या चित्रपटावर चर्चा असेल. जागतिक सिनेमावर मराठीत लिखाण फारच थोडे. मी मुख्यत: लिहिणार आहे ते जागतिक सिनेमावरती. गोव्याच्या IFFI पासून कार्लोव्ही व्हेरी च्या KVIFF पर्यंत अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये पाहीलेल्या विविध सिनेमांची ही ओळख....